सिंधुदुर्ग कोरोनामुक्त होण्यासाठी प्रशासनाचा “सिंहाचा वाटा”

236
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विक्रात सावंत; सेवा देणा-या पोलिस आरोग्य प्रशासनाचे मानले आभार

सावंतवाडी.ता,१०:
लॉकडाऊनच्या काळात सिंधुदुर्ग पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे जिल्हा कोरोनामुक्त होण्यास मदत झाली.आलेले संकटही दुर झाले, कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही.त्यामुळे पोलिस व जिल्हा प्रशासनालाच आहे,असे मत शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख विक्रांत सावंत यांनी मांडले.
कोरोनाच्या काळात रात्र सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आरोग्य सेविका व कर्मचाऱ्यांनी तेवढीच काळजी घेतली आहे.त्यामुळे जिल्हा कोरोना मुक्त होऊ शकला याचा अभिमान जिल्हावासीय म्हणून आम्हाला आहे,असेही सावंत म्हणाले.सावंत यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांचे काम चांगले आहे.विशेषता राज्यात आणि ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला,मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांनी प्रेमाची सक्ती करून कायदा राबविल्यामुळे त्याचा फायदा झाला व लोकांनी सहकार्य केले.तर आपल्या जिवावर उदार होवून जिल्हा आरोग्य यंत्रणेने परिश्रम घेतले म्हणूनच आज जिल्हावासिय बिनधास्त आहेत.

\