भाजपाच्या वतीने उपक्रम; आरोग्य-पोलीस कर्मचाऱ्यांना लाभ…
बांदा,ता.१०:
बांदा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र व बांदा पोलीस स्टेशन कर्मचारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर व हॅन्डग्लोजचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी बांदा शहर अध्यक्ष राजा सावंत, तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, साई धारगळकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, तालुका सचिव ज्ञानेश्वर सावंत, विकी केरकर, संजय नाईक, स्वप्नील सावंत, श्रीधर सावंत, गणेश माडगूत, साहील कल्याणकर आदी उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व पोलीस कर्मचारी संजय हुंबे, विजय जाधव यांनी अभार व्यक्त केले.
फोटो:-
बांदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांना सॅनिटायझर देताना भाजपचे पदाधिकारी.