मुलाच्या वाढदिवसानिमित्त केली मुख्यमंत्री सहायता निधीला मदत…

142
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवलीतील पत्रकार भगवान लोकेंचा समाजासमोर आदर्श…

कणकवली,ता.१०: देशभरात कोरोनाव्हायरस प्रसाद दिवसेदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने मदतीचे आवाहन समाजातील घटकांना केले आहे.त्यानुसार कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला.त्या वाढदिवसाचा खर्च व जमवलेले खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९ या नावे २५०० रुपयांचा धनादेश कणकवली तहसीलदार आर.जे.पवार याच्याकडे सुपूर्द केला आहे.
पत्रकार भगवान लोके यांचा ६ वर्षाचा मुलगा कु.मानस याचा आज वाढदिवस होता.कुटूबीयांनी हा वाढदिवस न करता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे ठरवले.दरवर्षी वाढदिवसाला येणारा खर्च यावर्षी शासनाला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खारीचा वाटा म्हणून मदत केली आहे.कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांच्या २५०० रुपयांचा धनादेश कु.मानस, मैथिली यांच्या हस्ते शासनाला प्रदान करण्यात आला.त्याच्या या सामाजिक बाधिलकीबद्दल सर्वच स्थरातून कौतूक होत आहे.

\