Wednesday, July 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवलीच्या चौकात निर्जंतुकीकरण कक्ष...

कणकवलीच्या चौकात निर्जंतुकीकरण कक्ष…

नगराध्यक्षांची संकल्पना;नागरिकांसाठी सुविधा

कणकवली, ता.१०: कोरोना प्रादुर्भावाचे संकट गडद होत असताना त्यापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी शहरातील पटवर्धन चौकात निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. अत्यावश्यक खरेदीसाठी घराबाहेर पडल्यानंतर नागरिकांच्या अंगावरील कपड्यांवर येणारे विषाणूंचा या सॅनिटायझर कक्षामध्ये नष्ट होतील आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होईल अशी अपेक्षा नगराध्यक्ष श्री.नलावडे यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व 17 प्रभागात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्ध नगरपंचायतीच्या माध्यमातून करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरात औषधे व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांचे संरक्षण व्हावे. नागरिकांच्या कपड्यांवर पडलेले विषाणू नष्ट व्हावेत यासाठी शहरातील पटवर्धन चौकात सॅनिटायझर कक्ष निर्माण केल्याची माहिती श्री.नलावडे यांनी दिली. तसेच हा कक्ष आजपासून कार्यान्वित देखील करण्यात आला आहे. या अत्याधुनिक सॅनिटायजर टनेल मधून नागरिकांसह गाड्यांचेही निर्जंतुकीकरण होण्यास मदत होणार आहे. या कक्षामध्ये ऑटो स्प्रिंगरमधून हायपोल्क्लोरिनद्वारे अखंड सॅनीटरायजेशनचा वर्षाव केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments