दुपारची घटना; १० एकर जमिनीत लाखोंचे नुकसान…
बांदा.ता.१०:
पाडलोस-केणीवाडा येथील सुमारे १० एकर काजू बागायतीस आज दुपारी साडेबारा तसेच सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास दोन वेळा आग लागली. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ऐन हंगामात लागलेल्या या आगीमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. कालD डेगवे, डिंगणे येथे आग लागून काजु कलमे जळाली होती.
सुमारे दहा एकर मध्ये लागलेल्या आगीत शेतकरी गोकुळदास परब तसेच करारावर घेतलेले अशोक अमरे या दोघा शेतकऱ्यांची मिळून सुमारे ८० हुन अधिक काजूची झाडे तसेच अकाशी, आयन, मोय तसेच अन्य झाडे असे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सांगितले.
आग विझविण्यासाठी माजी ग्रा. पं. सदस्य हर्षद परब, पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल, युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक, ग्रामस्थ अजित कोरगावकर, महादेव नाईक, समीर कोरगावकर, भैया अमरे, एकनाथ नाईक, सप्रेम परब, अमित अमरे, बंटी नाईक, सिद्धेश सातार्डेकर, आनंद कुबल, साईश नाईक, सिद्धेश कोरगावकर, बबलू नाईक, राजा पटेकर, राजन नाईक, सचिन कोरगावकर, वामन केणी, विश्वनाथ नाईक आदी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.