सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९४ “फिवर क्लिनीक” सुरू…

243
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी.ता,१०: जिल्ह्यातील आरोग्य वर्धिनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय या सर्व संस्थांमध्ये एकूण 94 फिवर क्लिनीक सुरू करण्यात आली आहेत.

तसेच तापाच्या आजाराच्या लक्षणांनुसार पुढील प्रमाणे उपचारांच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सौम्य प्रकारच्या रुग्णांना उपचारासाठी 17 संस्थांमध्ये सीसीसी अर्थात कोवीड केअर सेंटर, मध्यम प्रकारच्या रुग्णांसाठी 4 डीसीएचसी अर्थात डेसिगनेटेड कोवीड हेल्थ सेंटर, व तीव्र प्रकारच्या रुग्णांच्या उपचारासाठी 1 डीसीएच म्हणजेच डेसिगनेटेड कोव्हीड हॉस्पिटल अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या 26 रुग्ण दाखल असून आतापर्यंत 81 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 68 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 13 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही पॉजिटीव्ह रुग्ण नाही. आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण 1355 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 374 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. 68 व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात असून 100 व्यक्तींचे 28 दिवसांचे अलगीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यामध्ये ताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रीय सर्वेक्षण सुरू आहे.
जिल्ह्यात मजूर, बेघर  व परराज्यातील कामगार यांच्यासाठी कॅम्प उभारण्यात आले असून त्यांच्या जेवनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज कुडाळ  येथील कॅम्पना स्वतः भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी अपर  जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संचारबंदी असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याविरोधाक पोलिसांनी आज 10 गुन्हे दाखल केले आहेत. तर 32 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

\