दोडामार्ग तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले…

450
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग/सुधाकर धर्णे,ता.१०:
तालुक्यातील अनेक गावात आज वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपुन काढले.गेल्या अनेक दिवसांपासुन दोडामार्ग मधील काही भागात ढगाळ वातावरण होते.आज संध्याकाळी पाचच्या सुमारास जोरदार वारे वाहु लागल्याने पाऊस लागणार याची प्रचिती बहुतेक लोकांना आलीच होती.
साधारण संध्याकाळी सहाच्या सुमारास जोरदार वारे आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसास सुरुवात झाली. दोडामार्ग शहरात त्याचबरोबर आजुबाजुच्या परिसरात आणि तालुक्यातील बऱ्याचशा गावात पावसाच्या सरिंचा शिडकाव झाला.
अवकाळी पडलेल्या या पावसाने मात्र साऱ्यांचीच तारांबळ उडाली.खासकरुन पोलीस चौकीवर गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचारी यांची तारंबळ उडाली. तर काही गावात या पडलेल्या पावसामुळे उन्हाळी पिक धोक्यात येण्याची शक्यता देखील वाढली आहे.

\