बांदा.ता,१०:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातार्डा ग्रामपंचायतीच्या वतीने गावात मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोना नियंत्रणासाठी एकूण ६३८ कुटुंबांना मास्क वितरीत करण्यात आले. शासन निर्देशानुसार प्रत्येक वाडीनुसार १५ स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली असून गरजू वृद्ध व अपंग व्यक्तींना आवश्यक मदत करण्यासाठी स्वयंसेवकांना ओळखपत्रे देण्यात आली. तसेच प्रत्येक वाडीनुसार धान्य वितरीत करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले.
यावेळी सरपंच भरत मयेकर, ग्रा. पं. सदस्य सागर राऊळ, किरण वेंगुर्लेकर, विलास राऊळ, कृषी अधिकारी ठाकूर, पोलीस पाटील मयेकर, ग्रामसेवक सोमा राऊळ, किरण प्रभू, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
सातार्डा ग्रामपंचायतच्या वतीने मास्क वाटप..
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES