सावंतवाडी, ता.१०: माजगाव हरसावंतवाडा येथील सेवानिवृत्त एसटी मेकॅनिक सिताराम उर्फ भाई दत्ताराम सावंत (६५) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले.
भाई सावंत यांनी सिंधुदुर्ग एसटी प्रशासनाच्या सावंतवाडीसह कणकवली आणि देवगड आदी एस टी डेपौमध्ये मेकॅनिक म्हणून काम केले होते , दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वराज्य संघटनेचे तसेच मराठा समाल संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते श्रीपाद सावंत तसेच कुलदीप सावंत यांचे ते वडील होत तर सावंतवाडी एसटी डेपोचे निवृत्त वाहक अशोक उर्फ दादा सावंत यांचे भाऊ तसेच दैनिक तरुण भारतच्या व्यवस्थापक विभागातील कर्मचारी वामन उर्फ राजू सावंत यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे , एक मुलगी , सून , एक भाऊ , बहिणी , भावजया , पुतणे , नातवंडे , जावई असा परिवार आहे.