सावंतवाडी तालुक्यात दोन शेकरूंची हत्या…

4816
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

फोटो व्हायरल ; संबंधित संशयितांवर गुन्हा दाखल करा, वन्यप्राणी प्रेमींची मागणी…

सावंतवाडी, ता. १० : तालुक्यातील एका ग्रामीण भागात दोन शेकरूंची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हत्या करणाऱ्या युवकाने आपला फोटो त्या मृत्त शेकरू व बंदुकीसह सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला.
दरम्यान याबाबतची तक्रार काही वन्यप्राण्यांनी वन विभागाकडे केली. परंतु अद्यापपर्यंत याकडे कोणी लक्ष दिले नसल्याचे वन्यप्राणी प्रेमींचे म्हणणे आहे.
याबाबतचे वृत्त मुंबईतील एका दैनिकाकडून प्रकाशित करण्यात आले आहे. यात संबंधित युवकाचा फोटो सुद्धा प्रकाशित करण्यात आला आहे. यातील संशयित तालुक्यातील एका गावात राहणारा असून तो शासकीय नोकरीत असल्याचे समजते. लॉकडाऊनच्या काळात घरी आल्यानंतर त्याने हे कृत्य केल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिक माहिती मिळू शकली नाही.

वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शेकरू या प्राण्याला संरक्षण देण्यात आलेले आहे. त्याला राज्य प्राण्याचा दर्जा दिलेला आहे. झाडावर राहणारी मोठी खारुताई असे तिला म्हटले जाते. आंबोली परिसरात व सह्याद्री घाटात हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र कायद्याने संरक्षित करण्यात आलेल्या प्राण्याची हत्या होऊन सुद्धा अद्यापपर्यंत वनविभाग गप्प का असा प्रश्न या वन्य प्राणी प्रेमी कडून व्यक्त केला जात आहे

\