वैभववाडी, ता.११: कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत आखवणे भोम यांच्यावतीने खबरदारीची उपाययोजना करण्यात येत आहे.मांगवली, उंबर्डे, कुसूर , किंजळीचा माळ येथील पुनर्वसन गावठाण तसेच बुडीत क्षेत्राबाहेरील आखवणे, भोम येथे किटक नाशक फवारणी, सॕनिटायझर वाटप तर कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले.
आखवणे व भोम ही गावे अरुणा प्रकल्पामुळे विस्थापित झाली आहेत.मांगवली, कुसूर, उंबर्डे, तसेच किंजळीचा माळ येथे पुनर्वसन करण्यात आले आहे.तर आखवणे व भोम बुडीत क्षेञाबाहेरही लोक विस्थापित झाले आहेत.ग्रामंचायतीच्यावतीने या सर्व ठिकाणी किटक नाशक फवारणी केली आहे.तर प्रत्येक कुंटुंबाला सॕनिटायझरचे वाटप करण्यात आले.तसेच गावातील कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले आहे.लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये.प्रत्येकाने स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.असे आवाहन सरपंच सौ.आर्या कांबळे, उपसरपंच आकाराम नागप यांनी केले आहे.यावेळी ग्रामसेवक वरक, व ग्रा.प.सदस्य उपस्थित होते.
फोटो-