खवय्याच्या जिभेला चटकाःचिकनचे भाव पुन्हा वधारले…

259
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पुरवठाच नसल्यामुळे परिस्थितीःमासे आणी मटणाच्या किंमतीही वाढल्या

सावंतवाडी/भक्ती पावसकर.ता,११: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर फक्त दहा ते वीस रुपयाला किलो असे अत्यंत कमी दराने मिळणार्‍या चिकनचे दर आता गगनाला भिडण्याची शक्यता आहे.मागणी आहे,परंतू पुरवठा नाही,अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आज एकशे तीस रुपये कीलो तर एकशे ऐंशी रुपये नेट अशा दराने सावंतवाडीत चिकनची विक्री झाली.त्यामुळे येत्या काही दिवसात खवय्याच्या जिभेला चटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान याबाबत चिकन विक्रेत्यांशी चर्चा केली असता, मागणी आहे,परंतू माल पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले पिल्लेच जाग्यावर नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे,असे सांगण्यात आले. त्यामुळे कीलोचा आकडा येत्या काही दिवसात अडीचशे ते तीनशे रुपयावर पोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान चिकनचे दर वाढत असताना मासे आणी मटणचे दर महागले आहे.त्यामुळे काही दिवस लॉकडाउनच्या काळात खवय्यांना आपल्या खिशाला कात्री लावावी लागणार आहे.

\