डी.के.सावंत यांची मागणी; आगाऊ बुकींग करुन छुपे उत्पन्न मिळवत असल्याचा आरोप…
सावंतवाडी,ता.११: गणेश चतुर्थी काळात कोकण रेल्वेसाठी करण्यात येणारे बुकींग चार महीने आगाऊ न करता ६० दिवस अगोदर करावे, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी.के.सावंत यांनी केले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. यात त्यांनी असे नमुद केले आहे की, लॉकडाउनच्या पार्श्वभूमिवर रेेल्वे प्रशासनाकडुन आगाऊ बुकींग घेवून नंतर ते रद्द केले जात आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या कोट्यावधी रुपयाचे छुपे उत्पन्न रेल्वेला मिळत आहे. आणि दुसरीकडे आयत्यावेळी तिकीटे रद्द करण्यात आल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशाला बसत आहे. त्यामुळे याबाबत रेल्वे प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.