जीवनावश्यक वस्तू देवून सोशल मिडीयावर प्रसिध्दी करणार्‍यांना दणका…

1026
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अजमेर जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय; त्यांच्या निर्णयाचे नेटकर्‍यांकडुन स्वागत…

मुंबई,ता.११:  कोरोनाच्या काळात गरजवंताना अन्नधान्य देवून त्यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन प्रसिध्दी मिळविणार्‍यांच्या विरोधात अजमेर जिल्हाधिकार्‍यांनी कडक निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचे फोटो व्हायरल केल्यास संबधितांवर गुन्हा दाखल करू,असा त्यांनी निर्णय घेतला आहे.
त्यामुळे अडचणीच्या काळात किरकोळ मदत करून आपली प्रसिध्दीकरुन घेणार्‍यांना चपराक बसणार आहे.याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर अजमेर येथिल जिल्हाधिकार्‍यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.तेथिल एका व्यक्तीने अडचणीत असलेल्या गरजवंत महीलेला फक्त एक केळे दिले होते, आणि हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला होता.या फोटोवर नेटकर्‍यांकडुन जोरदार टिका करण्यात आली होती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अशा प्रकारे काहीशी मदत करून आपली प्रसिध्दी करून घेणार्‍यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

\