खानोली-धनगर वाडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

210
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नारायण राणेंच्या वाढदिवसा निमित्त वेंगुर्ले भाजपाचा उपक्रम…

वेंगुर्ला,ता.११:   महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार श्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने वेगुर्ले तालुक्यातील खानोली गावातील धनगर समाजातील कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्या वतीने हे वितरण करण्यात आले. यावेळी खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, उपसरपंच सुभाष खानोलकर, माजी जि. प. सदस्य समीर नाईक, महेश प्रभूखानोलकर, पोलिस पाटील खानोलकर, प्रकाश खरात आदी उपस्थित होते.

\