उद्धव ठाकरे; लोकांनी शिस्त बाळगल्यास त्याचा फायदा होईल…
मुंबई, ता.११: कोरोनाचा धोका लक्षात घेता चौदा तारखे नंतरच सुद्धा महाराष्ट्रात लाॅकडाऊन कायम ठेवणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा नियमित होत राहील. मात्र संक्रमण सोडण्यासाठी लोकांनी शिस्त बाळगल्यास त्याचा फायदा निश्चितच होईल परंतु आत्ताच काही मी सांगू शकत नाही असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला केले
अधिक वाचा
सर्वानी शिस्त पाळल्यास ३० एप्रिल नंतर सकारात्मक निर्णय घेता येईल, मात्र त्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. या आजारातून बाहेर पडण्यासाठी राज्यभरातील टीम कार्यरत आहे. त्यामुळे कोणीही चिंता करू नये,असेही ठाकरे म्हणाले.
श्री.ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी आपण शासनाकडून जाहीर केलेले लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवत असल्याचे जाहीर केले.काही ठिकाणी बंधने शिथिल होऊ शकतात,मात्र याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही.रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र जे रुग्ण सापडतात त्यांच्या घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी तपासणी करत आहेत. आतापर्यंत १९ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. शोधण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आह. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याचे लक्षात आल्यामुळे चौदा तारखे नंतर सुद्धा आपण पुढे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी दर्शवली आहे.