सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५२ व्यक्ती अलगीकरणात…

322
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.११ : जिल्ह्यात आतापर्यंत ४५२ व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी ३८० व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.तर संस्थात्मक अलगीकरणामध्ये ७२ व्यक्ती असून १०६ व्यक्तींनी २८ दिवसांचा अलगीकरण कालावधी पूर्ण केला आहे.
जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये 29 रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत मिरज येथे तपासणीसाठी 82 नमुने पाठविण्यात आले असून त्यापैकी 74 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 9 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.
आरोग्य यंत्रणेमार्फत आज 1795 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यामध्ये ताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रीय सर्वेक्षण सुरू आहे.
जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना नियमित मिळणाऱ्या 35 किलो धान्याव्यतिरीक्त 5 किलो प्रति व्यक्ती धान्य मोफत देण्यात येत आहे. तसेच केशरी शिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती 3 किलो गहू 8 रुपये प्रति किलो दराने आणि 2 किलो तांदूळ 12 रुपये दराने मिळणार आहे.
जिल्ह्यातील स्थलांतरीत, बेघर, मजूर व कामगारांसाठीच्या कॅम्पमध्ये असलेल्यांची प्रशासनातर्फे योग्य ती काळजी घेण्यात येत असून त्यांच्या जेवणाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जेवण व नाष्ट्या व्यतिरिक्त त्यांना लागणाऱ्या वस्तू जसे टुथपेस्ट, साबण यांचाही पुरवठा करण्यात येत आहे.

\