कणकवली तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा…

197
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सह्याद्रीपट्ट्यातील काही गावात गारा कोसळल्या…

कणकवली, ता.११:  कणकवली तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील अनेक गावांमध्ये आज अवकाळी पाऊस झाला. तर काही गावांमध्ये गाराही कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे काही काळ शीतलता होती.
प्रादेशिक हवामान विभागाने आज सिंधुदुर्गात गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली होती. सायंकाळ चार नंतर कणकवली शहरासह सह्याद्रीपट्ट्यातील गावांमध्ये पावसाचा शिडकावा झाला. यात शिवडावसह लगतच्या गावांमध्ये गारा देखील कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे उन्हाच्या झळांमधून नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र पाऊस थांबल्यानंतर पुन्हा तीव्र उकाड्याला सुरवात झाली.

\