महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गची मागणी…
ओरोस ता.११: सध्या कोरोना व्हायरस (कोविड १९) मुळे शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. देशात या सर्व परिस्थितीचा शासनाने गांभीर्याने विचार करून देशातील कर्जदारांचे तीन हप्ते स्थगित करण्याचे निर्देश रिझर्व बँक ऑफ इंडिया ने दिलेले आहेत. तसेच या गंभीर परिस्थितीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र शासनाने मार्च २०२० या महिन्याचा ७५% पगार अदा करण्याचा आदेश दिले आहेत त्यामुळे प्राथमिक शिक्षक पतपेढीचे सभासद असणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनींनाही आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने संचालक मंडळाला विनंती करण्यात येत आहे की,आपल्या बँकेचे कर सल्लागार यांचे योग्य मार्गदर्शन घेऊन पतपेढीच्या सर्व कर्जदारांचे पुढील तीन कर्ज हप्ते स्थगित करावेत व मार्च चा कर्ज हप्ता सभासदांच्या ठेव खाती जमा करावा. याबाबत आपण तातडीची परिपत्रक सभा घेऊन सर्व सभासदांच्या हिताचा व दिलासा देणारा निर्णय घ्यावा,अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे प्राथमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष पाताडे व जिल्हा कार्यकारिणी यांनी केली आहे.