पडवे-धनगरवाडी परिसरात आढळली २ मृत माकडे…

203
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.११:
तांबुळी ग्रामपंचायत क्षेत्रातील पडवे-धनगरवाडी येथे पाण्याच्या तळीशेजारी २ माकडे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सरपंच अभिलाष देसाई व उपसरपंच शिंदे यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही मृत माकडांची विल्हेवाट लावली.
पडवे धनगरवाडी येथील एकाचा माकडतापाने मृत्यू झाला होता. त्यामुळे मृत माकडे सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तांबुळी ग्रामपंचायतीच्या वतीने या परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

\