पालकमंत्र्यांची ग्वाहीःलोकांचे लॉकडाउनला सहकार्य त्यामुळे या ठीकाणी भिती नाही…
सावंतवाडी/अमोल टेंबकर.ता,११:राज्यात लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला असला,तरी सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही महत्वाच्या सेवा सुरू करण्याचा आमचा विचार आहे. याची अमंलबजावणी येत्या उद्यापासुन सुरू होईल,अशी माहीती पालकमंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान या ठीकाणी आपण लॉकडाउन आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्याचा गोपनिय दौरा केला. यावेळी मात्र शंभर टक्के येथिल लोकांनी त्याला प्रतिसाद दिल्याचे दिसले असेच सहकार्य राहीले, तर जिल्ह्यातील नागरीकांना कोणतीही भिती नाही असे त्यांनी सांगितले.यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर,उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी मुळीक तहसिलदार राजाराम म्हात्रे,पोलिस निरिक्षक शशिकांत खोत,शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राउळ,युवा नेते अमेय तेेंडोलकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री सामंत पुढे म्हणाले, राज्यात लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी या ठीकाणी सुदैवाने कोणीही रुग्ण नसल्यामुळे आता संचारबंदी हळूहळू शिथिल करण्यात येणार आहे. त्याचा निर्णय उद्यापासुन घ्यावा तत्पुर्वी स्थानिक नागरीकांशी चर्चा करण्यात यावी अशा सुचना मी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत .
ते पुढे म्हणाले, अचानक लॉकडाउन झाले आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक कामे रेंगाळली आहेत त्यात पाणी टंचाई,रस्ते विकासकामांचा समावेश आहे मात्र सदयस्थितीत चार ही बाजूने नाका बंदी असल्यामुळे जिल्ह्यात जे कामगार आहेत त्यांना घेवून कामे सुरू करण्यास हरकत नाही. मात्र ही कामे करताना आवश्यक असलेली खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशा सुचना संबधितांना देण्यात येणार आहेत.
आंबा काजुचे नुकसान होवू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे कॅनिंगचा आंबा रत्नागिरी आणी सिधुदूर्ग जिल्ह्यातच खरेदी करण्यात येणार आहे तर काजू बोंडूला गोव्यात मार्केट उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे
काही झाले तरी प्रसंगी आणीबाणी आली तरी महाविद्यालयासह सीईटीच्या परिक्षा घेण्यात येणार आहेत त्यामुळे कोणी अफवांना बळी पडू नये तसेच सिधुदूर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोव्याच्या दिशेने येणारी दारू रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे