लाखोंची हानी; केळी बागायतीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
दोडामार्ग/सुधाकर धर्णे.ता,११: काल शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या गारांच्या पावसाने तिलारी पाळये तिठा, तिलारी भटवाडी घोटगेवाडी येथे अक्षरशः हाहाकार उडाला.पाच मिनिटे झालेल्या चक्रीवादळामुळे पाळये तिठा पाळये रस्त्त्यावर त्याचबरोबर आजुबाजुच्या परिसरातील अनेक झाडे हजारो केळी गुरांचा गोठा सुपारी झाडे शेत मांगर शेडचे पञे इतर फळ झाडे मोडून पडली तर अनेकांच्या घरांची कौले पञे दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर जाऊन पडले.केरळीयन लोकांनी भटवाडी येथे लागवड केलेल्या हजारो केळी आडव्या पडल्या शिवाय इतर शेतकरी यांचे केळी सुपारी मोडून पडल्या तर पाळये वाघेरी बंधारा येथे अनेक झाडे पोफळी रस्त्त्यावर पडल्याने पाळये रस्ताच लाॅकडाऊन झाला.या वादळाने लाखो रुपयांची हानी झाली आहे.
पाळये तिठा येथे झालेल्या या वादळाने तिलारी विजघर मार्गावर तसेच घोटगेवाडी पाळये मुख्य रस्त्यावर अनेक झाडे मोडून पडली.
पाळये तिठा येथील अरुण बाबली शेटकर, यांच्या घराशेजारी असलेल्या आंबा फणस या फळ झाडाच्या फांद्या अर्ध्यावर मोडून घराच्या वर पडल्या केळी मोडून पडल्या फणसाच्या फांदीपासून चार चाकी वाहन थोडक्यात वाचले. शेटकर यांची पाळीव जनावरे आहेत.यासाठी घराशेजारी सुका व ओला चारा तयार केला होता.वाऱ्याने गोळा करून ठेवलेला चारा दूरवर उडून जाऊन पडला तर ओला चारा संपूर्ण आडवा पडला घराच्या पडवीवर फणसाची फांदी पडून नुकसान झाले.शेडचे केळीचे नुकसान झाले धरलेले फणस आंबे जमीनीवर कोसळले. त्यामुळे
अरुण शेटकर यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.
पाळये तिठा येथे राहात असलेल्या मायकल लोबो याच्या घराशेजारी आंबा झाडाची भली मोठी फांदी मोडून पडली सुदैवाने घर टेम्पो वाहन थोडक्यात वाचले.तर घराच्या समोर काही अंतरावर लागवड केलेल्या हजारो केळी जागांपैकी शेकडो केळी मोडून पडल्या. त्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले.
पाळये तिठा वाघेरी बंधारा येथे चक्री वादळाचा तडाखा बसला येथे असलेल्या सुपारी फोफळी वीस ते पंचवीस झाडे तसेच येथे असलेले भले मोठे कोकमचे झाड तसेच फणसाचे झाड इतर झाडे ही संपूर्ण रस्त्त्यावर पडली त्यामुळे पाळये गावातील रस्ता पूर्णपणे बंद झाला पायी चालत जाण्याच्या वाटा पण बंद झाल्या.शनिवारी सकाळी येथील सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो यांनी पाळये रस्त्त्यावर पडलेली झाडे
तोडून दुचाकी वाहन जाईल अशी वाट मोकळी केली.येथे दिपक दळवी याची सुपारी झाडे मोडून पडली त्यामुळे मोठे नुकसान झाले.गणपत नाईक यांची काजू झाडे मोडून पडली.