कलियुगातील ”कोरोना व्हायरस” एक चेतावणी…

328
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी/पंकज मोरे.ता,१२:  सध्या जगभरात खळबळ माजवली आहे ती “कोरोना व्हायरसने”. सगळ्यांनाच माहिती आहे की, हा व्हायरस चीन मधल्या वुहान या शहरात सध्या प्रचंड प्रमाणात प्रसार आहे. अख्ख जग या महामारीत सापडले आहे. लाखोंना या रोगाची लागण झाली असल्याने जगभरात हजारो जणांचा बळी गेला आहे. राज्यात ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे.
भारताला देखील मुंबईचं शांघाय करायचं आहे. पण ते साध्य करण्यासाठी किती आणि कुणाकुणाचा बळी जाईल याचा विचार आपण कधी केलाय का? हा केवळ नैसर्गिक बळी नसून मानव जातीचही त्यात नुकसान आहे. हे चीनकडे बघून आपल्याला समजायला हवं. “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” असं देखील याला म्हणता येईल. पुरातन काळात धरतीवरचा हाहाकार कमी करण्यासाठी देव विविध रूप धारण करायचे. पण या कलियुगात मानवाने देवालाही मागे टाकलेय म्हणून का काय देव विविध प्रकारचे रोग धरतीवर पाठवून हा संहार थांबवण्याची चेतावनी देत असतो. कधी स्वाइन फ्लू कधी बर्ड फ्लू आणि आता कोरोना व्हायरस. पण इतका संहार होऊनही मानव सावध होईल का? जगबुडी कधी ना कधी होणारच आहे. पण आपण आपल्या वर्तणुकीमुळे त्याला हातभार लावतोय का? आपल्या चुकीच्या सवयींमुळे आपण खरंच प्रगती करतोय की मानवजातीला हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर ढकलतोय हे विचार करण्याजोगं आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने कितीही प्रगती केली असली तरी निसर्गावर मात करु शकत नाही. हे मात्र नक्की.! गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात प्रलयकारी पावसाने अक्षरशः थैमान घालून निसर्गाचा समतोल म्हणजे काय याची प्रचिती देत निसर्गापुढे कुणाचे काही चालत नाही हे दाखवून दिले आहे. त्यामुळे निसर्गावर अतिक्रमण करणाऱ्यांना पाऊसरुपी प्रलयाने चांगलाच धडा शिकविला असून भविष्यात निसर्गाविरोधात वागाल तर त्याचे काय परिणाम होतील याचे संकेतच दिले आहेत.
यांत्रिकीकरणाच्या युगात मानवाने खूप मोठी प्रगती केली आहे. नवनवीन शोध लावले आहेत. मानव हळूहळू निसर्गावर अतिक्रमणही करु लागला आहे. वृत्त वाहिन्यांवर मुंबईसह जगातील पंधरा शहरे येत्या तीस वर्षात पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात सतत मुंबईत भरणारे पाणी, नदी, नाले, समुद्र किनारी अतिक्रमण करुन त्याठिकाणी इमारती वसविणे. त्याचबरोबर औद्योगिकरण, शहरीकरणामुळे तापमानात झालेली प्रचंड वाढ यामुळे हिमालयातील बर्फ ही वितळू लागले आहेत. त्यामुळे समुद्रात पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. ही सर्व आपत्ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आपत्ती आहे. याला फक्त आणि फक्त आपण मानवच जबाबदार आहोत.
कॉंक्रिटीकरणामुळे पाणी जिरण्यालाही वाव नाही आहे. त्यामुळेच मोठमोठया शहरांमध्ये प्रलय झाला की, ठिकठिकाणी पाणी भरते. त्यामुळे मोठी जिवितहानी व वित्तहानी होते. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीत अनेक जीवांचा नाहक बळी गेला. या प्रलयरुपी झालेल्या जखमा मनाला धस्स करुन टाकणा-या आहेत. नैसर्गिक आपत्ती पुढे माणूस तरी काय करू शकतो?
कोव्हिड19 कोरोना व्हायरस या महामारी रोगाचा केंद्रबिंदू चिनच्या वुहान शहरात आहे. हळूहळू या महामारी रोगाने अख्ख जग विळख्यात घेतले आहे. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे ही सर्वसामान्य या रोगाची लक्षणे आहेत. आपण विज्ञान प्रगत असल्याच्या बतावण्या करतो परंतु अध्यात्मिकच्या पुढे विज्ञानही हतबल होताना दिसत आहे. मानवाने वेगवेगळे तंत्रज्ञान अवगत केले. तेवढेच त्याचे दुष्परिणाम होताना दिसत आहे.

\