सावंतवाडी तहसिलदारःलोकांसह आपल्या आप्ताच्या सुरक्षेसाठी सबुरीने घ्या
सावंतवाडी.ता,१२:
लॉकडाउनच्या काळात सर्व ठीकाणी नाकाबंदी असताना काही जण चोरवाटांनी येण्याचा प्रयत्न करीत आहे,अशा बर्याचश्या तक्रारी प्राप्त होत आहे.त्यामुळे असे लोक आढळून आल्यास त्यांच्यासह त्यांना आश्रय देण्यार्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करू,असा इशारा सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी दिला आहे.
दरम्यान मुंबई पुण्यासारख्या ठीकाणी कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता,या ठीकाणी प्रशासनाची नजर चुकवून येणार्यांनी आपल्यासह आपल्या आप्तांची काळजी करावी,आणी थोडे सबूरीने घ्यावे असे ही त्यांनी सांगितले.श्री म्हात्रे म्हणाले,सगळीकडे नाकाबंदी आहे.असे असताना काही जण आंब्याच्या कींवा भाजीच्या गाडीतून या ठीकाणी येत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. माजगाव येथे एक व्यक्ती कोेल्हापुरातून आला होता.तशी तक्रार तेथिल लोकांनी केली होती. या पार्श्वभूमिवर खुद्द जिल्हा प्रशासनाकडुन तसे आदेश देण्यात आले आहेत.याचा त्यामुळे ज्यांना कोणाला यायचे आहे.त्यांनी पोलिस महासंचालकांची रितसर परवागनी घेवून यावी अशा प्रकारे चोरवाटांनी येण्याचा प्रयत्न करू नये.