लॉकडाऊन मुळे दोडामार्गातील चिरेखाण खाण व्यावसायिक संकटात…

155
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ऐन हंगामात उपासमारी; नुकसान भरपाई द्या, शासनाकडे मागणी….

दोडामार्ग/सुधाकर धर्णे ता.१२: तालुक्यातील चिरेखाण व्यवसायिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐन हंगामात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे नुकसानीचा सामना करत आहेत.दरम्यान याबाबत शासनाने योग्य त्या पद्धतीने विचारविनिमय करून,नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करावे,अशी मागणी आता संबंधित व्यवसायिकांमधून होत आहे.

पावसाळा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात घर बांधणी किंवा दुरुस्तीसाठी चिरे दगड यांची मागणी असते मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे संचारबंदी लागु झाल्यानंतर गेला महिनाभर ह्या खाणी बंद आहेत.तालुक्यात साधारणपणे वीस च्या आसपास चिरेखणी असुन त्यामधे जवळपास ३०० -३५० कामगार वर्ग काम करतो ,मात्र समचारबंदीचा फटका या व्यवसायाला बसल्यामुळे हा कामगार वर्ग सध्या रिकामीच बसला आहे.या कामगारांवर अवलंबुन असणारे त्यांचे कुटुंब देखिल आता संकटात सापडले आहे.
महसुल विभागाकडे लाखो रुपयांचे महसु़ल भरुन परवाना घेवुन सुरु केलेल्या या खाणी ऐन हंगामात बंद कराव्या लागल्याने चिरेखाण व्यवसायिक संकटात सापडला आहे.या अशा संकटात कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे पोट तसे भरायचे झालेला खर्च कसा भरुन काढायचा असा यक्ष प्रश्न आता या व्यवसायिकांना सतावु लागला आहे.

\