आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला पाचशे लिटर सॅनिटायझर…

355
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरि,ता.१२: जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित सामंत यांनी केलेल्या विनंतीवरून आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आज सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला ५०० लिटर सॅनिटायझर जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याहस्ते सुपूर्त करण्यात आले.
यावेळी उपाधिक्षक गुजर जिल्हा गुन्हा शाखेचे धनावडे जिल्हाधिकारी श्रीमती.मंजू लक्ष्मी यांचे प्रतिनिधी राणे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, प्रांतिक सदस्य सावळाराम अणावकर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रा.सचिन पाटकर आदी.उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले,महाराष्ट्रात आलेल्या या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अजूनही सॅनिटायझर तसेच इतर अन्य वस्तूंची कमतरता भासली तर आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार रोहित पवार आणि सुप्रियाताई सुळे यांनी दिले आहे. याच बरोबर या महामारीला तोंड देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही दिली.

\