मुंबई ता.१२: कोरोनाच्या रुग्ण संख्येनुसार राज्याची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.यात पंधरापेक्षा कमी रुग्ण असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज तर काहीच रूग्ण नसलेल्या जिल्हयांना ग्रीन झोन मध्ये घेण्यात आले आहे.त्यात सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये।समावेश आहे.
कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.यात १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेले जिल्हे रेड झोन मध्ये तर १५ पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज झोन मध्ये आहेत.आणि एकही रुग्ण नसलेल्या जिल्हयांचा ग्रीन झोनमध्ये समावेश केला आहे. लॉकडाऊन संदर्भात रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू करण्याचे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.एकंदरीतच देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने सरकार सर्वोतापरी खबरदारी घेत आहे.