सिंधुदुर्ग लुपिन फाउंडेशनचा पुढाकार;१०० कुटुंबांना दिला लाभ…
वेंगुर्ले.ता.१२:
लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग मार्फत ग्रामपंचायत शिरोडा येथे कोरोना आपत्कालीन परिस्थितीमुळे शिरोडा गावात अडकलेल्या बेघर, गरीब परप्रांतीय अशा जवळपास १०० कुटुंबांना शिधा वाटप ( जीवनावश्यक वस्तू) करण्यात आले. सदर उपक्रम लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्गचे श्री. योगेश प्रभु यांच्या हस्ते व शिरोडा सरपंच श्री. मनोज उगवेकर व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला.
परप्रांतीय कुटुंब ज्या विभागात वास्तव्यास आहेत त्या ठिकाणी जाऊन शासन नियमांचे पालन करून सदर उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य राहुल गावडे , कौशिक परब, दिलीप गावडे, विशाखा नाईक, प्राची नाईक, तृप्ती परब, संजय फोडनाईक उपस्थित होते. या वेळी लक्ष्मीकांत कर्पे, संतोष अनसुरकर, उत्तम आरोस्कर, सोमकांत सावन्त तसेच ग्रा पं कर्मचारी नीता मुणगेकर, सिद्धेश गावडे, रवी परब यांचे सहकार्य लाभले.