खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी;ऑफलाईनसह ऑनलाईन सेवा देण्याची मागणी
सावंतवाडी.ता,१२: गणेश चतुर्थीसाठी कोकण रेल्वेचे होणारे ऍडव्हान्स बुकिंग थांबविण्यात यावे व चतुर्थीपूर्वी फक्त महिनाभर अगोदर ते बुकींग घेण्यात यावे अशी मागणी लोकसभा खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.विशेष बाब म्हणून ही गोष्ट मान्य करावी,जेणेकरून लॉकडाऊनच्या काळात चाकरमान्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल,असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी आज रेल्वेमंत्री गोयल यांना पत्र दिले. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला याबाबतची माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी येत आहे.मात्र लॉकडाऊन चा कालावधी असल्यामुळे आगाऊ बुकिंग करणे शक्य होणार नाही त्यामुळे १२० दिवस अगोदर बुकींग थांबविण्यात यावे व चतुर्थीच्या एक महिना पूर्वी ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने बुकिंग घेण्यात यावे जेणेकरून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फायदा होईल असे त्यांनी म्हटले आहे.