Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामालवणात जनतेच्या सेवेसाठी ७१ स्वयंसेवक नियुक्त...

मालवणात जनतेच्या सेवेसाठी ७१ स्वयंसेवक नियुक्त…

तहसिलदार अजय पाटणे यांची माहिती ; स्वयंसेवकांमार्फत सेवा उपलब्ध करून घेण्याचे आवाहन…

मालवण, ता. १२ : कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने मालवणातील नागरिकांच्या सेवेसाठी व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत ७१ जणांना स्वयंसेवक पास देण्यात आले आहेत. शहरी विभाग स्वयंसेवकांची यादी तहसीलदार अजय पाटणे यांनी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ६१ स्वयंसेवकांसह तिघांना दूध पुरवठा, तिघांना औषध पुरवठा, दोघांना जेवण पुरवठा, एकास शिवभोजन थाळी पुरवठा करण्यासाठी तर एका आंबा बागायतदारास पास देण्यात आला आहे.
कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने तहसीलदारांनी नेमणूक केलेल्या स्वयंसेवकांची यादी जाहीर करावी अशी मागणी जनतेतून होत होती त्यानुसार तहसील कार्यालयाकडून पास दिलेल्या स्वयंसेवकांमध्ये राजीव बादेकर, कांचन चोपडेकर, मिलिंद परूळेकर, अक्षय हळदणकर, अमित कारेकर, प्रथमेश कुलकर्णी, रॉकी डिसोझा, मंदार आजगांवकर, भुषण म्हापणकर, अँगलबडे डिसोझा, आगोस्तीन डिसोझा, लिनस डिसोझा, आशिष नाबर, अनिकेत फाटक, योगेश पटकारे, उदय रोगे, गणेश गावकर, सचिन तळाशिलकर, भूषण मेस्त्री, अनिल तावडे, दीपेश पवार, शिल्पा खोत, परशुराम लुडबे, देवेंद्र मराळ, दिलीप नाईक, सुहास चव्हाण, संजय पाताडे, अक्षय सामंत, धनेश हडकर, महेश परुळेकर, दीप जुवेकर, संजय जुवेकर, स्वप्नील आचरेकर, प्रदीप आंबेरकर, विजय कामत, अंकुश गावकर, अमेय मांजरेकर, उदय परब, प्रवीण रेवंडकर, हरी चव्हाण, सचिन पेडणेकर, हेमंत शिरगावकर, संतोष शिरगावकर, मोनिका फर्नांडिस, शिवप्रसाद नाईक, हेमंत जंगले, हनुमंत रेवंडकर, सिद्धार्थ जाधव, दिलीप शिरपुटे, आंतोन फर्नांडिस, रविकिरण आपटे, ऑलविन फर्नांडिस, शांतीलाल दिवानी, सौगंधराज बादेकर, सिद्धेश मांजरेकर, राजन जाधव, रोहित मेथर, दिगंबर लुडबे, मिलन ताम्हणकर, लक्ष्मण चव्हाण, विनायक प्रभूझाट्ये याचा तर दूध पुरवठ्यासाठी मकरंद मयेकर, सुशांत तायशेटे, सतीश पाटकर यांना तसेच औषध पुरवठ्यासाठी सूर्यकांत फणसेकर, शैलेश सामंत, उमेश मांजरेकर. जेवण पुरवठा- नीलम शिंदे, विद्या फर्नांडिस. शिवभोजन थाळी- वैशाली तळाशिलकर. आंबा बागायतदार- भार्गव पेडणेकर यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments