सिंधुदुर्गनगरी.ता,१२: जिल्ह्यात आतापर्यंत ४५८ व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी ४०४ व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. तर संस्थात्मक अलगीकरणामध्ये ५४ व्यक्ती असून ११९ व्यक्तींनी २८ दिवसांचा अलगीकरण कालावधी पूर्ण केला आहे.
जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये ३६ रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत मिरज येथे तपासणीसाठी ९१ नमुने पाठविण्यात आले असून त्यापैकी ७४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर १७ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.
आरोग्य यंत्रणेमार्फत आज ४६० व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यामध्ये ताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रीय सर्वेक्षण सुरू आहे.
जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना नियमित मिळणाऱ्या ३५ किलो धान्याव्यतिरीक्त ५ किलो तांदूळ प्रति व्यक्ती मोफत देण्यात येत आहे. सदरचे मोफत धान्य देताना लाभार्थ्याने स्वाक्षरी किंवा अंगठा द्यायचा आहे. हे धान्य तीन महिने म्हणजेच एप्रिल, मे व जून या महिन्यांमध्ये देण्यात येणार आहे. तसेच केशरी शिधापत्रिका धारकांनाही मे व जून महिन्यांकरिता प्रती व्यक्ती ३ किलो गहू ८ रुपये प्रति किलो दराने आणि २ किलो तांदूळ १२ रुपये प्रती किलो दराने मिळणार आहे. या धान्याचे वाटप करताना धान्य दुकानदारांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी.
जिल्ह्यात ४५८ व्यक्ती अलगीकरणात…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES