तहसीलदार म्हात्रेंची माहिती; शस्त्रक्रियेचे कारण देऊन आले गावी…
बांदा ता.१२: मुंबईतून बांद्यात आलेल्या एका कुटुंबासह एकूण ७ जणांना सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन केल्याची माहिती सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
यातील ४ जणांचे कुटुंब हे मुंबईतील हॉटस्पॉट ठरविण्यात आलेल्या वरळी येथून आले होते. सुरुवातीला माजगाव येथे वास्तव्य केल्यानंतर हे कुटुंब बांदा येथे आले होते. याची माहिती स्थानिक पोलीस व आरोग्य विभागाला मिळाल्यानंतर कुटूंबातील सर्व सदस्यांची तपासणी करून त्यांना होम कोरन्टीयन करण्यात आले आहे. त्यांनी शस्त्रक्रियेचे कारण देऊन मुंबई ते बांदा प्रवास केला होता.याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे.
आज सकाळी मुंबईहुन दुचाकीने जिल्ह्यात येणाऱ्या दोघा युवकांना खारेपाटण तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले. हे दोन्ही युवक बांदा परिसरातील आहेत. प्रशासनाने त्यांची देखील तपासणी करून त्यांना बांदा येथे कोरन्टीयन केले आहे. याठिकाणी एकूण ७ जणांना कोरन्टीयन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार म्हात्रे यांनी दिली.