कणकवली,ता.१२: तालुक्यातील घोणसरी येथील सुमारे दहा एकर बागेला आग लागली. त्यामध्ये काजूची सुमारे ६५० झाडे जळून खाक झाली असून, त्यामुळे ५ ते ६ लाखाचे नुकसान झाले आहे. या आगीमागचे कारण समजू शकलेले नाही.
घोणसरी येथील धरणाच्या बाजूला विदूला विकास सबनीस आणि अविनाश विकास सबनीस यांची दहा एकर जागेत काजूच्या झाडांची बाग आहे. गेल्या सात ते आठ वर्षा पासून ही झाडे उत्पन्न देत असून, यावर्षीही चांगले उत्पन्न मिळणार होते. मात्र, अचानक दुपारी आग लागल्याने त्या आगीत सर्व झाडे जळून खाक झालीत. यामध्ये सुमारे ६५० काजू कलमे होती. ही आग दुपारी लागल्याने आटोक्यात येऊ शकलेली नाही. त्यामुळे संपूर्ण बाग आगीत भस्मसात झाली. याबाबत शासकीय यंत्रणेला कळविण्यात आले असून अद्याप त्याचा पंचनामा झालेला नाही. या आगी मागचे कारण समजू शकले नाही.
घोणसरी येथे काजू बागेला आग;६५० अधिक झाडे जळून खाक…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES