उदय सामंतांचे स्पष्टीकरण; पुढील निर्णयासाठी चार कुलगुरूंची समिती..
वेगुर्ले.ता,१३: दहावीसह नववी व अकरावीची परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी महाविद्यालयीन परीक्षा काही झाले तरी होणार त्यासाठी चार कुलगुरूंची समिती नेमण्यात आली असून,याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, त्यामुळे कोणी संभ्रमात राहू नये असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
दरम्यान अगदीच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास,ऑनलाईन कींवा अन्य वेगळ्या पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत आमचा विचार सुरू आहे.लवकरच प्लान आखण्यात येईल. त्यासाठी आवश्यक असलेली राज्यपालांची मंजुरी घेण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.वेंगुर्ला येथे ते पत्रकारांशी बोलत होते.दहावीचा भुगोलचा तसेच नववी व अकरावी ची परीक्षा रद्द झाल्यानंतर पुढे काय?असा प्रश्न विचारला असता,त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले काही झाले तरी महाविद्यालयात परीक्षा घेण्यात येणार आहे.