वेंगुर्ल्यात १८१ वाहन चालकांवर कारवाई…

466
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संचारबंदीचे केले उल्लंघन; ४२ हजार रुपये दंड वसूल..

वेंगुर्ला ता.१३:
संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्या १८१ वाहन चालकांवर वेंगुर्ला पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे ४२ हजारांचा दंड वसूल केला.
वेंगुर्लेत ३ ते १२ एप्रिल कालावधीत म्हणजेच दहा दिवसांत वेंगुर्ला शहरासह बाजारपेठेत लायसन नसणे, कागदपत्रे नसणे, हॅल्मेट नसणे, गाड्यांना आरसे नसणे, तसेच एकाच ठिकाणी गाडी लावून गर्दी करणे आदी प्रकरणांत आढळलेल्या दुचाकी व चारचाकी अशा १८१ वाहनचालकांवर ४२ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई वाहतुक पोलिसांनी केली. सदरची कारवाई वेंगुर्ला पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस मनोज परुळेकर, सहाय्य पोलिस उपनिरीक्षक अच्युत परब, डी.बी.पालकर, महिला कॉन्स्टेबल रुपाली वेंगुर्लेकर, महिला पोलिस नाईक, काशी पाटकर या पथकाने केली आहे. दरम्यान अजूनही लॉक डाऊन सुरू असल्याने नागरिकांनी कामा शिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

\