Monday, April 28, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकवयित्री सरिता पवार यांनी राखले समाजभान

कवयित्री सरिता पवार यांनी राखले समाजभान

र्कातकरी कुटुंबांसह गरजवंतांना दिल्या जीवनावश्यक वस्तू

कणकवली, ता.13 ः अन्न, पाणी आणि निवारा या मूलभूत गरजांपासून कोसो दूर असलेल्या आणि नियमित रोजगार नसलेल्या कातकरी बांधवांची सध्या परवडच सुरू आहे. यापार्श्‍वभूमीवर कवयित्री सरिता पवार यांनी आपला वाढदिवसादिवशी कातकरी कुटुंबासह एकूण 12 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू देत सामाजिक भान राखले.
लॉकडाऊनमुळे हजारो जणांचे रोजगार नाहीसे झाले. यात हातावरचे पोट असलेल्या आणि समाजप्रवाहापासून दूर असलेल्या कातकरी बांधवांवर तर उपाशी झोपण्याची वेळ आली. शहरातील जानवली नदीपात्रालगत झोपड्या बांधून कातकरी कुटुंब मुलाबाळांसह राहत आहेत. कोरोनामुळे या कातकरी बांधवांना मिळणारी मजुरीची कामेही बंद झाली. या कातकरी कुटुंबांच्या मदतीसाठी अखंड लोकमंच संस्थेचे अध्यक्ष आणि प्रख्यात चित्रकार नामानंद मोडक यांनी आवाहन केले होते. त्याबाबतची माहिती समजल्यानंतर कवयित्री सरिता पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तांदूळ, बटाटा, तूरडाळ, कांदे, मसाला, मीठ, साखर, चहापावडर, गोडेतेल, खोबरेल तेल, साबण असलेल्या वस्तूंच्या 10 हजार रुपयांची पदरमोड करून 12 किट चे वाटप केले. शहरालगतच्या वरवडे फणसवाडीतील नदीपात्रात राहणार्‍या 4 कातकरी कुटुंबांना, कणकवली गणपतीसाना येथील 2 कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तर करंजे येथील 2 कातकरी कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी अखंड लोकमंच चे नामानंद मोडक यांच्याकडे सुपूर्त केल्या. याखेरीज त्यांनी अन्य 4 गरजू कुटुंबीयांनाही जीवनावश्यक वस्तू दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments