Monday, March 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यालॉकडाऊन काळात शिवसेना सदैव जिल्हावासियांच्या पाठीशी...

लॉकडाऊन काळात शिवसेना सदैव जिल्हावासियांच्या पाठीशी…

संजय पडते; गोरगरीब गरजूंना धान्य पुरवठा व इतर मदत करणार…

वेंगुर्ले ता.१३:
लॉकडाऊन वाढल्याने पुढील काळात लागणारी धान्य व इतर मदतही जिल्ह्यातील गोरगरिबांना शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. तसेच राज्यात कोरोनाचे संकट असतानाही जिल्ह्यातील विकास निधी न थांबवता पालकमंत्री उदय सामंत यांनी सावंतवाडी न. प. साठी १० कोटी पेक्षा जास्त निधी, वेंगुर्ला न. प. साठी ३ कोटी ३० लाख तर दोडामार्ग साठी १.५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामुळे या संकट काळात शिवसेना सदैव जिल्हावासीयांच्या पाठीशी असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी वेंगुर्ला येथे पत्रकार परिषदेत दिली.
कोरोना विषाणूच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन केल्यानंतर या काळात जिल्ह्यातील मजूर, कामगार, परप्रांतीय कामगार, गोर गरीब नागरिक, गोवा येथे अडकून असलेले जिल्ह्यातील युवक- युवती यांना पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक यांच्या माध्यमातुन शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामार्फत जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. हे असेच पुढेही चालू राहणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते पुढे बोलताना म्हणाले की, कोरोनाच्या संकट काळात शिवसेनेच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून जिल्ह्यात धान्य वाटप, मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. तसेच आता लॉकडाऊन वाढल्यामुळे पुढील दोन दिवसात प्रत्येक तालुक्यात गरजूंना डाळ, तांदूळ यासारखे तसेच इतर जीवनावश्यक धान्य वाटप करण्यात येणार आहे. जनतेनेचे या लॉकडाऊनच्या काळात चांगले सहकार्य केले असून प्रशासन, डॉक्टर, आरोग्य सेवक, पोलीस हे चांगले काम करत आहेत.
तसेच या कोरोनाच्या संकटातही जिल्ह्यातील विकास कामांचा निधी थांबला नसून पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रत्येक न प ला ३ लाख रुपयांचा निधी नियोजन मधून कोरोनावर उपपयोजना करण्यासाठी देण्यात आला आहे. तसेच इतर विकासकामासाठीही निधी देण्यात आला आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ज्या ज्या कामांची मागणी केली होती ती सर्व मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे या संकट काळात शिवसेना ही जनतेच्या सदैव पाठीशी असून पुढील नियोजनासाठी सतर्क असल्याचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच नियोजन चा अध्यक्ष हे पालकमंत्रीच असल्यामुळे सर्व विकासनिधी तेच मंजूर करतात. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी हा निधी देताना कधीच भेदभाव केला नाही. शिवसेनेच्या माध्यमातून सर्व विकासकामे ही मार्गी लागत असल्याने इतर कोणीही फुकाचे श्रेय घेऊ नये असेही जिल्हाप्रमुख पडते म्हणाले. यावेळी वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, शहरप्रमुख अजित राऊळ, सचिन वालावलकर, पंकज शिरसाट, उपतालुकाप्रमुख शशिकांत परब, अमेय प्रभूतेंडोलकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments