कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमृता कॅशु फॅक्टरीकडून उपक्रम…
वेंगुर्ले.ता,१३:
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणिवेतून जनसामान्यांना मदत करण्यासाठी वेंगुर्ले येथील अमृता कॅशु फॅक्टरी तर्फे मालक श्री. सिद्धार्थ सुरेश प्रभूझांटये यांनी वेंगुर्ला तालुक्यातील ३०० गरीब कुटूंबियांना जीवनावश्य अन्नधान्याचे ठीक ठिकाणी वाटप केलं.
वेंगुर्ला शहरातील राऊळवाडा, भराडी मंदिर, आनंदवाडी, घाडीवाडा, गवळीवाडा, देऊळवाडा, तसेच वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा, परबवाडा, अनसूर, वायंगणी, अवेर, तेंडोली, पाट परुळे या भागातील गरीब कुटुंबियांना आणि शेतकऱ्यांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी फॅक्टरीचे मॅनेजर श्री. अजित पालव, नगरसेविका सौ.पूनम जाधव, श्री सुधीर गावडे, श्री प्रवीण पाणकर इत्यादी उपस्तिथ होते.
दरम्यान श्री. सिद्धार्थ सुरेश प्रभूझांटये आणि श्री सुरेश प्रभूझांटये यांच्या तर्फे रु एक लाख (१,०००००) मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी महाराष्ट्र कॅशु असोसिएशन कडे देण्यात आले असल्याचे श्री. प्रभूझांटये यांनी सांगितले.