सातोसेत १० वर्षीय मुलगा नदीत बुडाला

331
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा ता.१३:
सातोसे-मुंबार्डावाडी येथील अनुराग केशव मयेकर (रा. सातोसे-दुर्गवाडी) हा दहा वर्षीय मुलगा तेरेखोल नदीत बुडून मृत झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. तेरेखोल नदीत तो आंघोळीसाठी गेला असावा असा अंदाज आहे. मृत अनुरागचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. बांदा हेड काँस्टेबल संजय हुंबे, पोलीस काँस्टेबल विजय जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली. पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. अनुरागचा मृत्यू कसा झाला याबाबत जबाब घेण्याचे काम सुरु आहे. शवविच्छेदन केल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेने सातोसेसह दशक्रोशीत खळबळ उडाली आहे.

\