तहसिलदारांची माहिती;पासचा गैरवापर झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने निर्णय…
सावंतवाडी.ता,१३: लॉकडाउन काळात येथिल तहसिलदार कार्यालयातून देण्यात आलेले सर्व पास आज पासुन रद्द करण्यात आले आहे.या पासचा गैरवापर होत असल्याचे पोलिस विभागाच्या निदर्शनास आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.अशी माहीती तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे,त्यात त्यांनी असे नमुद केले आहे.की लॉकडाउनच्या काळात तहसिलदार कार्यालयाकडुन पास वितरीत करण्यात आले होते.मात्र त्या पासेसचा गैरवापर होताना दिसत आहे.त्यामुळे ते पास रदद् करण्यात आले आहेत.त्यामुळे असे पास घेवून कोणी प्रवास करीत असेल तर त्यांच्यावर इतरा प्रमाणेच कारवाई होईल,असे त्यांनी म्हटले आहे.