“संचारबंदीच्या” पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पोलिसांचे संचलन…

391
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.१३: कणकवली शहरात संचारबंदीचे काटेकोर पालन व्हावे याअनुषंगाने शहरात आज पोलिसांनी संचलन केले. त्याबाबतची माहितीही ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यासह इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते. दरम्यान कणकवली शहरात विनाकारण फिरणार्‍या दुचाकीस्वारांवर आजही पोलिसांनी कारवाई केली.

कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र मच्छीमार्केट व इतर ठिकाणी संचारबंदी तोडून नागरिक रस्त्यावर येत आहेत. त्याअनुषंगाने नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी कणकवली शहरात आज पोलिसांनी संचालन केले. शहरातील पोलिस स्टेशन ते पटवर्धन चौक तेथून बाजारपेठमार्गे पटकीदेवी मंदिर आणि तेथून रवळनाथ मंदिर पर्यंत हे संचलन करण्यात आले. यावेळी संचारबंदीचे काटेकोर पालन करण्याबाबतच्या सूचना उपविभागीय पोलिस अधिकार नितीन कटेकर यांनी दिल्या. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने डीजे, स्पीकर लावणे तसेच जमाव जमल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला.

\