मुख्यमंत्र्यांचा निर्णयःराज्याच्या आठही तपासणी नाक्यावर “रॅपिड टेस्ट” सेवा सुरू करणार
पणजी.ता,१३:लॉकडाउनच्या काळात राज्यातील जनतेला आवश्यक असलेली सेवा देणार्या शासकीय कर्मचार्यांची ने आण करण्यासाठी २०६ कदंबा बस परवापासून सुुरु करण्यात येणार आहे.तसेच ज्या खात्याची आवश्यकता आहे. अशी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे,मात्र लोकांनी तात्काळ त्या ठीकाणी गर्दी करण्यासाठी येवू नये,असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले पोलिसांनी सगळ्या ठीकाणी बंदोबस्त वाढविलेला आहे.राज्याच्या आठ ही तपासणी नाक्यावर रॅपीड टेस्टचा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे,कोरोनाबाबत जनजागृती होण्यासाठी आरोग्य अॅप सर्वानी डाउनलोड करावे तसेच जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तशा प्रकारची चर्चा त्यांच्यासोबत करण्यात आली आहे.