लॉकडाऊन असतानाही वेंगुर्लेत गोवा बनावटी दारू

322
2
Google search engine
Google search engine
Google search engine

तीन ठिकाणी वेंगुर्ला पोलिसांची कारवाई : २७ हजार ५०० रुपयांची दारू जप्त

वेंगुर्ला: ता.१३
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन असून संचारबंदी ही सुरू आहे. मात्र तरीही वेंगुर्ला तालुक्यात गोवा बनावटी दारू सुरू होती. याबाबत वेंगुर्ले पोलिसांना कळताच त्यांनी चारी ठिकाणी अवैध दारू अड्यांवर धाडी टाकुन सुमारे २७ हजार ५०० रुपयांची गोवा बनावटीची काजू फेणी दारू जप्त केली आहे.
तालुक्यातील वेतोरा, आजगाव, वेंगुर्ला शहर अशा चार ठिकाणी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. या केलेल्या कारवाईत वेतोरा कोंडस्करवाडी येथे झाडाखाली बसून दारू विक्री करत असताना येथील यशवंत विष्णू पाटील यांच्यावर वेंगुर्ला पोलिसांनी धाड टाकत सुमारे २ हजार रुपये किमंतीची १० लिटर काजू फेणी जप्त केली. पोलीस कॉन्स्टेबल गौरव परब व सचिन सावंत यांनी ही कारवाई केली. आजगाव भोमवाडी येथील पास्कु जुजे डीसोजा याला राहत्या घराच्या मागील बाजूस दारू विक्री करत असताना पोलिसांनी छापा टाकला. यात सुमारे १ हजार ५०० रुपयांची ५ लिटर काजू फेणी जप्त करण्यात आली. पोलीस हेड कॉन्स्टेबल भिसे, अजित जाधव, योगेश वेंगुर्लेकर यांनी ही कारवाई केली.
वेंगुर्ला शहर येथील तोडणे स्टॉप नजीक रुजाय लॉरेन्स अराऊज यांच्यावर दारू विक्री करत असताना पोलिसांनी धाड टाकत सुमारे ४ हजार रुपये किमंतीची २० लिटर काजू फेणी जप्त केली. पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, महिला पोलीस रुपा वेंगुर्लेकर, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पाटील, अमर कांडर यांनी ही कारवाई केली. तर वेंगुर्ला शहरातील दाभोसवाडा येथे भगवान सत्यवान बटवलकर यांच्यावर दारू विक्री करत असताना पोलिसांनी धाड टाकत सुमारे २० हजार किमंतीची १०० लिटर काजू फेणी दारू जप्त केली. एएसआय परब, पोलीस कॉन्स्टेबल रूपा वेंगुर्लेकर, पीएसआय रुपाली गोरड, डीबी पालकर, सुरेश पाटील यांनी ही कारवाई केली.

\