खासदार विनायक राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी…
कणकवली.ता१३:लॉकडाऊनच्या काळात कोणाचीही उपासमार होऊ नये,यासाठी ऑफलाइन रेशन कार्डधारकांना धान्य पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दया,अशी मागणी लोकसभेचे खासदार विनायक राऊत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी ई-मेल पाठवून विविध गरजूंचे लक्ष वेधले आहेत.यात बाबत त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकारांना माहिती दिली आहे.त्यात त्यांनी असे म्हटले आहे की लॉकडाऊन च्या काळात अनेक लोकांकडे रेशन कार्ड नसल्यामुळे किंवा ऑनलाईन रेशन झाले नसल्यामुळे धान्य मिळण्यास अडचण येत आहे.त्यामुळे उपासमार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा लोकांना जेवण मिळावे यासाठी याबाबतचा तात्काळ निर्णय घेण्यात यावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे.