बांदा पोलिसांची कारवाई ; उद्या सावंतवाडी न्यायालयात हजर करणार…
बांदा, ता. १३ : फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल आज सायंकाळी उशिरा बांदा पोलिसांनी दोघा युवकांना ताब्यात घेतले. या दोघांविरोधात बांदा पोलिसांत ६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सविस्तर माहिती देण्यास बांदा पोलिसांनी नकार दिला.
या दोघा संशयितांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह संदेश पाठविल्याचे तक्रारीत म्हटले होते. आज सायंकाळी उशिरा दोघा युवकांना ताब्यात घेण्यात आले. यातील एक संशयित शहरातील असून दुसरा बांदा परिसरातील आहे. पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. उद्या दोघा संशयितांना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.