सावली फाउंडेशनचा उपक्रम ; गरजूंसह खाण कामगारांना मास्कचेही वाटप…
मालवण, ता. १३ : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेल्या साळेल येथील सावली फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने साळेलमधील रास्त धान्य ग्राहकांना घरपोच धान्य पुरवण्याची विनामूल्य सेवा पुरविण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात सावली फाऊंडेशनने जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साळेल गावात सावली फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. संस्थेच्या अध्यक्षा विनिता गावडे यांच्या संकल्पनेतून गावातील गरजू ग्रामस्थांना, चिरेखाण कामगारांना मास्कचे वाटप करण्यात आले. चौके येथील रास्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांनी खरेदी केलेले धान्य साळेल गावासह आंबडोस कदमवाडी येथील ग्रामस्थांना विनामूल्य सेवेत घरपोच करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी सावली फाऊंडेशनचे आभार मानले. या उपक्रमाला अध्यक्षा विनिता गावडे, सुनीला गावडे, रश्मी गावडे, रुचिता गावडे, रश्मी परब, रिया घाडी, प्राची हडपी या सदस्यांचे सहकार्य लाभले. यावेळी गावचे पोलिस पाटील रवींद्र गावडे आदी उपस्थित होते.