बांदा पोलिसांची कारवाईः २८ हजाराच्या दारुसह दिड लाखाचा मुद्देमाल जप्त..
बांदा.ता,१४: लॉकडाउनच्या काळात बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी विविध तीन ठीकाणी केलेल्या कारवाईत आज येथिल पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले.जावेद पिरसाब शेख वय ३८ रा मोरडोंगरी सावंतवाडी व जामन्ना बसव्वा वय २८ रा माजगाव भटवाडी,धीरज जगन्नाथ गाडेकर वय २३ रा करवीर कोल्हापुर,हर्ष शिवकुमार जयस्वाल २२ विष्णू लक्ष्मण नाईक २४ दोघे ही राहणार माजगाव असा या पाच जणांचा समावेश आहे.
यात ८३ हजार रुपयांच्या नवीन अॅक्टिवा गाडीसह
३ हजार ९०० रुपयांची दारु जप्त केली. ही कारवाई डेगवे स्थापेश्वर मंदिर नजीक हेड काँस्टेबल दिलीप धुरी व धनंजय गोळे यांनी केली.
दुसर्या कारवाईत ३ हजार १२२ रुपयांची दारु जप्त केली. यात गोवा बनावटीच्या मॅकडावेलच्या १८० मिलीच्या १८ बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या. याप्रकरणी धीरज जगन्नाथ गाडेकर (२३, रा. करवीर, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस काँस्टेबल धनंजय गोळे यांनी डेगवेत केली. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरा करण्यात आली.
तिसर्या कारवाईत कमांड थ्री एक्स रमच्या १४४ बाटल्या, रॉयल कोकोनट फेनीच्या ४८ बाटल्या व काजू फेणीच्या एक लिटरच्या १५ बाटल्या असा एकूण २१ हजार ७८० रुपयांची दारु जप्त केली. या दारु वाहतुक प्रकरणी हर्ष शिवकुमार जयस्वाल (२२) व विष्णू लक्ष्मण नाईक (२४, दोघेही रा. माजगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. दारु वाहतुकीसाठी वापरलेली ५० हजार रुपयांची ग्राझिया (एमएच ०७ एके ४३५६) मोटरसायकल जप्त करण्यात आली. ही कारवाई आज सकाळी ६.३० वाजता इन्सुली चर्चनजीक पोलीस काँस्टेबल महेश भोई व प्रशांत पवार यांनी केली.