पालकमंत्री उदय सामंतांची उपस्थिती; कासव मित्र बस्त्याव ब्रिटो यांनी केली होती संरक्षित…
वेंगुर्ला ता.१४: येथील नवाबाग सुखटनकरवाडी येथे ऑलिव्ह रिडले जातीच्या १०० कासवांच्या पिल्लांना महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उभादांडा नवाबाग येथील समुद्रकिनारी समुद्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. कासवाने घातलेल्या १३४ अंड्यांचा खड्डा किनाऱ्यावर उभादांडा येथील कासव मित्र बस्त्याव ब्रिटो यांनी संरक्षित केला होता. या खड्यातून अंड्यांपैकी १०० कासवांची पिल्ले आज सकाळी बाहेर आली. याबाबत ब्रिटो यांनी वनविभागाला कळविले. तसेच वेंगुर्ले येथे आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनाही ही घटना कळऊन आपल्या उपस्थितीत या पिल्लांना समुद्रात सोडुया असे कळविले. त्यांनाही हा आगळा वेगळा कार्यक्रम अनुभवता आला. त्यांच्या उपस्थितीत व वनविभागाच्या सहकार्याने या सर्व कासवाच्या पिल्लांना समुद्रात म्हणजेच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, शिवसेना तालुका प्रमूख यशवंत परब आदी उपस्थित होते.