सिंधुदुर्गनगरी ता.१४: जिल्ह्यातील काजू व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांची मदत दिली आहे.याबाबतचा धनादेश आज पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
आजच्या या कठीण काळामध्ये कोकणातील काजू व्यवसाय अडचणीत आला असताना देखील एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या काजू व्यापाऱ्यांनी केलेली मदत हे नक्कीच एक सर्वांसाठी उल्लेखनिय उदाहरण आहे,असे गौरवपूर्ण उदगार पालकमंत्री यांनी या वेळी काडून सर्वांचे महाराष्ट्र शासनाचे वतीने आभार मानले.
या वेळी शिवसेना जील्हाप्रमुख श्री.संजय पडते त्याचबरोबर काजू व्यापारी बाळकृष्ण गाडगीळ,विलास ठाकूर,राजेश तेंडोलकर आदी उपस्थित होते.