लॉकडाऊनमुळे माजगाव येथे अडकलेल्या परप्रांतीयांना दिला लाभ…
सावंतवाडी ता.१४: येथील अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून माजगाव-दत्तमंदिर येथे लाॅक डाऊनमुळे अडकून पडलेल्या बिहार तसेच झारखंड येथील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
शहारापासून पासुन जवळच असलेल्या माजगाव (दत्त मंदिर ) येथे मोल-मजुरी करुन उदर निर्वाह करणाऱ्या बिहार,झारखंड येथील एकूण सात कुटुंबांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या येथील पदाधिकाऱ्यांकडून तांदूळ,तुरडाळ,गहू ,आटा,कांदे,बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.यापुर्वीही जुलै २०१९ च्या महापूरात संकटात सापडलेल्या झोळंबे,असनिये,इन्सुली शेर्ले,मणेरी,शिरशिंगे,कलंबिस्त,चंदगड येथील ८२ कुटुंबांना २ लाख ४ हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण सर्व प्राथमिक शिक्षकांच्या मदतीने करण्यात आले होते.
यावेळी संयुक्त राज्य चिटणीस म.ल.देसाई, तालुका सचिव बाबाजी झेंडे, माजी अध्यक्ष सुभाष सावंत श्री.नंदकिशोर कवठनकर,मंगेश देसाई,श्री. नाईक आदी उपस्थित होते.